jacqueline fernandes and yohani

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने(Jacqueline Fernandez Dance With Yohani) श्रीलंकन गायिका योहानीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये ‘माणिके मागे हिते’(Manike Mage Hithe Video) गाण्यावर पानी पानी हो गयी गाण्याच्या स्टेप्स वापरून दोघींनी डान्स केला आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) कायम सोशल मीडियावर आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जॅकलीनचा एक डान्सचा व्हिडिओ खूप व्हायरल(Viral Video) झाला आहे.

    अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने(Jacqueline Fernandez Dance With Yohani) श्रीलंकन गायिका योहानीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये ‘माणिके मागे हिते’(Manike Mage Hithe Video) गाण्यावर पानी पानी हो गयी गाण्याच्या स्टेप्स वापरून दोघींनी डान्स केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जॅकलीनने म्हटलंय की, ‘तुम्ही जेव्हा श्रीलंकेत असाल तर योहानीसोबत माणिके मागे हितेवर डान्स करा.जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला ही संधी मिळेल. या गाण्यावर माझं खूप प्रेम आहे.’

    इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.लोकांनी या व्हिडिओवर अनेक कमेंटही केल्या आहेत.