jacqueline fernandez

अलीकडेच जॅकलीननं पुढाकार घेत 'शेरॅाक्स' लाँच करण्याची घोषणा केली होती. याचीच दाखल घेत 'टाइम्स ४० अंडर ४०'नं जॅकलीनचं नाव सामील केलं आहे.

    आजघडीला श्रीलंकन मॅाडेल आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनं बॅालिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. हिंदी सिनेसृष्टीसोबतच दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत जोडी जमवणारी जॅकलीन कोरोना विरोधातील लढाईतही सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. स्वत:हून पुढाकार घेत तिनं अन्नदानासारखं पुण्यकर्म केलं.

    एका पेक्षा एक सरस सिनेमा जॅकलीनच्या पर्समध्ये असणाऱ्या जॅकलीननं ‘टाइम्स ४० अंडर ४०’मध्ये आपली जागा बनवली आहे. या यादीत सामील होणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. अलीकडेच जॅकलीननं पुढाकार घेत ‘शेरॅाक्स’ लाँच करण्याची घोषणा केली होती. याचीच दाखल घेत ‘टाइम्स ४० अंडर ४०’नं जॅकलीनचं नाव सामील केलं आहे. महिला सशक्तीकरण, एकत्रीकरण आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम जॅकलीन ‘शेरॅाक्स’च्या माध्यमातून करणार आहे.

    याद्वारे महिलांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यातील शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न जॅकलीन करणार आहे. याशिवाय वर्कआऊट सिरीजच्या माध्यमातून जॅकलीन सुदृढ जीवनाचा मंत्रही महिलांना देणार आहे. जॅकलीनचं हे पाऊल कौतुकास्पद असून, सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे.