Jacqueline Fernandez beauty tipas2

‘रोटी बैंक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलीन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत, अभिनेत्रीने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे.

    अभिनेत्रीने नेहमीच्या आयुष्यातील दयाळूपणा आणि चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली असून या चांगल्या आणि समाजोपयोगी कामासाठी जॅकलीनने अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत जोडून घेतले आहे; ज्या समाजाच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असे काम समाजाच्या तळागाळात जाऊन काम करत आहेत.

    ‘रोटी बैंक’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, जॅकलीन या महिन्यात एक लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार असून फीलाइन फाउंडेशनसोबत, अभिनेत्रीने भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी एक उपक्रम सुरु केला आहे. त्यासोबतच, कोविड काळातील फ्रंट लाइन कार्यकर्ता मुंबई पोलिस दलाला मास्क आणि सॅनिटायझरचे देखील वितरण करण्यात येणार आहे. 

     

    जॅकलीन फर्नांडीस कठीण काळात ज्यांना सर्वाधिक गरज होती त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे, मग ते पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे, ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती.