jai jai swami samarta

जय जय स्वामी समर्थ ही आध्यात्मिक मालिका आजापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिकेच्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात अनेक स्वामी भक्त आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सगळ्यांना उत्सुकता आहे ती स्वामी समर्थांची भूमिका कोण साकारणार? प्रोमो सुरू झाल्यानंतर तर उस्तुकता आणखीनच वाढली. या मालिकेत अक्षय मुडावतकर हा कलाकार स्वामी समर्थांची भूमिका साकारणार आहे. अक्षयने या आधी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत काम केलं होतं. तसंच गांधी हत्या आणि मी हे नाटकही त्याच्या नावावर आहे. स्वामी समर्थ म्हणून त्याची छबी लक्ष वेधून घेत आहे. शिरिष लाटकर यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे.

श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले.  त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत. हिमालय, भारत – चीन सीमा, काशी, त्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्य, सुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे. आजच्या काळात यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांचे उपदेश असाधारण शक्ती देऊन जातात आणि हेच अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय पाहून एक प्रकारचे बळ मिळते आजच्या विज्ञाननिष्ठ काळात का बरं यांचे तत्वज्ञान धीर देतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत… तेंव्हा नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.