jems bond

जेम्स बॉण्डचे जगात कोट्यावधी चाहते आहेत आणि त्यांचे चित्रपट, सिरीज कोट्यावधी प्रेक्षक आजही मोठ्या उत्सुकतेने पाहतात. त्याचा ००७ हा नंबर अनेकांचा लकी नंबर ठरला आहे. काही दिवसापूर्वीच एका गुजरातच्या व्यक्तीने त्याच्या कारच्या ००७ या नंबरसाठी तब्बल ३४ लाख रूपये मोजले. आता बेवर्ली हिल्समध्ये ज्युलियन ऑक्शन तर्फे बॉण्डच्या 007 या पिस्तुलचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ००७ पिस्तुलला २५,६००० डॉलर्स म्हणजे १ कोटी ९० लाख रूपये देण्यात आले.  

पिस्तुली मागचा इतिहास

हे पिस्तुल हॉलीवूड नगरीच्या इतिहासाचा एक भाग आहे. जेम्स बॉंडच्या भूमिकेत तुफान लोकप्रियता मिळविलेल्या शॉन कॉनरीने हे पिस्तुल वापरले होते. हे पिस्तुल म्हणजे त्याची ओळख बनले होते. सेमी ऑटोमॅटिक वोल्थर पीपी पिस्तुलचे हे छोटे मॉडेल आहे. हीच गन कॉनरीने १९६२ मध्ये ’डॉ. नो’ चित्रपटात सर्वप्रथम वापरली होती.

एका अमेरिकन नागरिकाने हे पिस्तुक खरेदी केलं आहे. अद्याप या व्यक्तीचं नाव जाहीर करण्यात आलं नाहीये. या व्यक्तीने जेम्स बॉंडचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. तो जेम्सचा मोठा चाहता आहे. या लिलावात ‘टॉप गन ‘ चित्रपटात टॉम क्रुझ याने वापरलेले हेल्मेट १०८००० डॉलर्स ला विकलं गेलय. तर ‘पल्प फिक्शन ‘मध्ये ब्रूस विलीसने वापरलेली तलवार ३५२०० डॉलर्स ना विकली गेली आहे.