कॉमेडियन जॉनी लिव्हरच्या मुलीने उडवली नेहा कक्करच्या नवऱ्याच्या खिल्ली, VIDEO होतोय व्हायरल!

जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे.

  कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता जॅमीने आणखी एक कॉमेडि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

  जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे. या व्हिडीओत जॅमी आशा भोसले यांची मिमिक्री करत म्हणते, “नेहा कक्कडचा भाऊ टोनी आहे ना त्याला मी टोनू बोलते, त्याची गाणी मस्त असतात, चला ऐकूया…मिल्कशेक ऐकलं आहे. आता तर प्रोटीन शेक पण आलं आहे. हे बूटी शेक काय आहे?” हे म्हणत जॅमी टोनीला चिडवताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत जॅमीने “हे कोणतं शेक आहे?” असा प्रश्न कॅप्शनमध्ये टोनी कक्करला टॅग करत विचारला आहे.

  २०१२मध्ये जॅमीच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून झाली होती. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.