चित्रपटांचं उत्तरप्रदेशातील शूट रद्द, ‘जनहित में जारी’!

'जनहीत में जारी'च्या टीमनं मध्य प्रदेशमधील चंदेरी आणि भोपालमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    सध्या नुसरत भरुचाकडे एका पेक्षा एक सरस चित्रपट आहेत. यापैकीच एक चित्रपट आहे ‘जनहित में जारी’… एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ‘जनहित में जारी’चं शूट उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार होतं, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं थांबावं लागलं. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक राज शांडील्य यांनी आता ‘जनहीत में जारी’चं चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नवीन गाईडलाइन्सच्या बंधनात राहून उत्तर प्रदेशमध्ये शूट करता येणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

     मागील काही दिवसांपासून तिथलं चित्र बदलत असलं तरी पुढील आदेश मिळेपर्यंत कोणताही निर्णय घेणं शक्य नसल्याचं चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून समजतं. या कारणामुळं ‘जनहीत में जारी’च्या टीमनं मध्य प्रदेशमधील चंदेरी आणि भोपालमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    या चित्रपटाची कथा एका छोट्याशा शहरात घडणारी असल्यानं त्यासाठी पोषक असणाऱ्या लोकेशनवर चित्रीत करणंच योग्य असल्याचं शांडील्य यांचं म्हणणं आहे. या चित्रपटात नुसरत कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या एक्सीक्युटीव्हच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तिनं शांडील्य यांच्या ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुष्मान खुरानासोबत काम केलं आहे.