जान्हवी कपूर पुन्हा मालदीवमध्ये? बिकीनीतला बोल्ड फोटो केला शेअर, ट्रोल करू नये म्हणून म्हणाली…

जान्हवी कपूरने एका मासिकाच्या कव्हरचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय.

  गेल्या महिन्यात अभिनेत्री जान्हवी कपूर मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. मालदीवमधील बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर देखील केले होते. मात्र नुकताच जान्हवीने एक फोटो शेअर करत ती मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली नसून कामानिमित्त गेलाच स्पष्ट केलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

   

  जान्हवी कपूरने एका मासिकाच्या कव्हरचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणाली, “आधीपासून कमिट केलेली पोस्ट. लॉकडाउनआधी फोटो शूट झालंय. आम्ही सर्व सुरक्षित आहोत आणि सर्व प्रकारची काळजी घेत आहोत. आशा करते तुम्ही सगळे सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेत असाल.” असं कॅप्शन देत जान्हवी कपूरने ट्रोल होण्याआधी फोटोशूट लॉकडाउनपूर्वीच झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  अनेक सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत असल्यामुळे ट्रोल झाले होते. मालदीवमधील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे या सेलिब्रेटींवर चाहत्यांनी निशाणा साधला होता.