जान्हवीने बदलले कारमध्ये कपडे, स्वत:च फोटो केला सोशल मीडियावर शेअर!

एका प्रमोशनल इवेंटनंतर जान्हवीने कारमध्येच कपडे बदलले आहेत. खुद्द जान्हवीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. ती आपले बोल्ड फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रीया देतात. सध्या जान्हवी तिच्या आगामी रूही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती प्रत्येक इवेंटमध्ये तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांची मने जिंकते. पण या इव्हेंटनंतरचा जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  एका प्रमोशनल इवेंटनंतर जान्हवीने कारमध्येच कपडे बदलले आहेत. खुद्द जान्हवीने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये तिने स्ट्रॅपलेस टॉपवर ओवरसाइज बो आणि हाय वेस्ट मिनी स्कर्ट परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  दुसऱ्या फोटोमध्ये जान्हवी कारमध्ये जीन्स घालण्याचा प्रयत्न करत आहे. जान्हवीला प्रमोशनल इवेंटनंतर लगेच फ्लाइट पकडायची होती. त्यामुळे तिला कॅज्युअल कपडे परिधान करायचे होते. हे फोटो शेअर करत जान्हवीने ‘अत्यंत आरामदायी दिवस होता’ असे कॅप्शन दिले आहे.