जान्हवीच्या रुही कि आफजा’? अदा, चाहते बघताच क्षणी झाले फिदा!

जान्हवीने रुहीच्या पहिल्या गाण्यातील लूकचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. 'रुही कि आफजा'? तुमची आवड काय आहे? असं कॅप्शन तीने या फोटोंना दिलं आहे. 'रुही' सिनेमातील 'पनघट' या गाण्यात जान्हवीचे दोन लूक दिसतं आहेत.

  राजकुमार रावच्या रूही चित्रपटातून जान्हवी कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. नुकतचं या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालंय. या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  जान्हवीने रुहीच्या पहिल्या गाण्यातील लूकचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ‘रुही कि आफजा’? तुमची आवड काय आहे? असं कॅप्शन तीने या फोटोंना दिलं आहे. ‘रुही’ सिनेमातील ‘पनघट’ या गाण्यात जान्हवीचे दोन लूक दिसतं आहेत. लाल लेहंगा जान्हवीला शोभून दिसतोय.तर काळ्या रंगातल्या ड्रेसमधला जान्हवीचा लूक पूर्ण हटके आहे. जान्हवीने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान लाईकस् दिले आहेत. तर काहींनी जान्हवी आई श्रीदेवी यांच्या सारखीच दिसत असल्याचं म्हंटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  येत्या ११ मार्चला ‘रुही’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘स्त्री’ सिनेमानंतर दिनेश विजान निर्मित हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झालीय.जान्हवी कपूर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ सिनेमाच्या शूटींगमध्ये सध्या व्यस्त आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)