japan film festival

जपान फाऊंडेशन नवी दिल्ली ने आज भारतामध्ये जपानी फिल्म फेस्टिवल (JFF) २०२० च्या चवथ्या आवृत्तीच्या सुरूवातीची घोषणा केली. १० दिवसीय हा एकमेव डिजीटल फेस्टिवल ४ ते १३ डिसेंबर २०२० पर्यंत आयोजित केला जाईल. यावर्षीच्या विस्तृत चित्रपट यादीमध्ये ऍनिमेशन, फिचर ड्रामा, रोमांस, थ्रीलर, क्लासिक आणि डॉक्युमेंट्री या वर्गवारीमधील विषयांचे जपानचे ३० चित्रपट आहेत. 'की ऑफ लाईफ', 'दि फ्लेवर ऑफ ग्रीन टी ओव्हर राईस' आणि 'प्रोजेक्ट ड्रीम - हाऊ टू बिल्ड मॅझिंजर झेड हँगर' या चित्रपटांनी फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे.

जपान फाऊंडेशन नवी दिल्ली ने आज भारतामध्ये जपानी फिल्म फेस्टिवल (JFF) २०२० च्या चवथ्या आवृत्तीच्या सुरूवातीची घोषणा केली. १० दिवसीय हा एकमेव डिजीटल फेस्टिवल ४ ते १३ डिसेंबर २०२० पर्यंत आयोजित केला जाईल. यावर्षीच्या विस्तृत चित्रपट यादीमध्ये ऍनिमेशन, फिचर ड्रामा, रोमांस, थ्रीलर, क्लासिक आणि डॉक्युमेंट्री या वर्गवारीमधील विषयांचे जपानचे ३० चित्रपट आहेत. ‘की ऑफ लाईफ’, ‘दि फ्लेवर ऑफ ग्रीन टी ओव्हर राईस’ आणि ‘प्रोजेक्ट ड्रीम – हाऊ टू बिल्ड मॅझिंजर झेड हँगर’ या चित्रपटांनी फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे.

https://watch.jff.jpf.go.jp/page/india/

जपानी फिल्म फेस्टिवल हे व्हर्च्युअल असल्यामुळे देशातील प्रत्येकजण एन्जॉय करू शकतो. दररोड ३ चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळतील.  या फेस्टिवलचा आनंद https://watch.jff.jpf.go.jp/page/india/ वर २४ तास  घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणतही शुल्क भरण्याची गरज नाही. दर्शकांच्या सोयीसाठी हे चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह जपानी भाषेमध्ये दाखवले जाणार आहेत.

जपान फाऊंडेशन नवी दिल्ली चे महासंचालक कारू मियामोटो म्हणाले, “भारतामध्ये फिल्म फेस्टिवल चालू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारत हा जपानी कलांसाठी महत्वाचे आणि वाढते मार्केट आहे कारण भारतीयांमध्ये जपानी संस्कृतीबद्दल कल आणि आवड दिसून येत आहे. आम्ही प्रेक्षकांच्या मागण्या जवळून लक्षात घेतल्या आणि त्यानुसार विविध वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेत त्यांच्यासाठी सोयीस्कर अशा 30 प्रसिद्ध जपानी चित्रपटांची यादी तयार केली. आतापर्यंत मेट्रो व्यतिरीक्त हैदराबाद, जयपुर इत्यादी शहरांमधून सुद्धा आलेला प्रतिसाद जबरदस्त आहे.”

जपानी फिल्म फेस्टिवल 2020 प्रसिद्ध जपानी चित्रपट दाखवत आहे जसेकी सुमिक्कोगुराशीः प्रॉडक्शन आय.जी. शॉर्ट ऍनिमेशनः (ड्रॉवर होब्स), वन नाईट, 0.5 mm, इकोथेरपी गेटवे हॉलिडे, अवर 30 मिनीट सेशन, लिटील नाईट्स, लिटील लव, स्टोलन आयडेंटिटी, ट्रेंबल ऑल यु वॉन्ट, दि ग्रेट पॅसेज, रेल्वे, कॅफे फ्युनिक्युली फ्युनिक्युली आणि बरेच काही.

10-दिवसीय फिल्म फेस्टिवल मध्ये उत्साह भरण्यासाठी जपान फाऊंडेशन नवी दिल्ली ने ‘यंग क्रिटिक कॉन्टेस्ट ‘ आयोजित केली. या स्पर्धे अंतर्गत फेस्टिवलच्या चित्रपट यादीमधील निवडक ऍनिमेशन चित्रपटांचे परिक्षण लिहायचं आहे. २४  डिसेंबर २०२० ला सहा विजेते घोषित केले जातील आणि त्यांना आकर्षक जपानी फिल्म फेस्टिवलच्या ट्रॉफीबरोबर प्रमाणपत्र देण्यात येईल.