बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जावेद अख्तर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

अंमली पदार्थ विरोधी आज दीपिकासह सारा अली खान (Sara Ali Khan) , श्रद्धा कपूर, चौकशी करणार आहे. तर शुक्रवारी रकुलची एनसीबीकडून चौकशी केली गेली. दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणबाबत सुप्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar)  यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)  मृत्यूनंतर चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण (Drugs Case) समोर आलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) , सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंग या चार अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी आज दीपिकासह सारा अली खान (Sara Ali Khan) , श्रद्धा कपूर, चौकशी करणार आहे. तर शुक्रवारी रकुलची एनसीबीकडून चौकशी केली गेली. दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणबाबत सुप्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar)  यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर

मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेते. तेवढं कोणीच नव्हतं. आजच्या मुला-मुलींना पाहिलं तर ते फिजिकली किती फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास ते व्यायाम करत असतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हांला ड्रग्ज व्यसनी वाटत आहेत. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं. ही आजकालची मुलं एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचं व्यसन आहे, असं म्हणणं हा तर निवळ मूर्खपणाचं आहे.

करणने एका निवेदनात दिले स्पष्टीकरण 

दरम्यान, बॉलिवूड निर्माता करण जोहर बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आहे. २०१९ मध्ये आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओबाबत करणने स्पष्टीकरण दिले आहे. करण यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, २८ जुलै २०१९ रोजी झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर केला गेला नव्हता. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मी अंमली पदार्थांचा वापर करत नाही किंवा अंमली पदार्थांच्या वापरास प्रोत्साहन देत नाही किंवा कोणाला घेण्यास सांगत नाही.