लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी…साताऱ्याच्या अज्यानं आणली काश्मिरी सून!

अजित पाटील हे साताऱ्याचे रहिवासी आहेत. तर सुमन देवी ही काश्मीरची रहिवसी आहे. अजित पाटील हे सैन्यात दाखल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर तैनात आहेत. जम्मूमध्ये एका मित्राच्या घरी अजित पाटील गेले होते. तेव्हा सुमन यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

सातारा: जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात पडतात. तेव्हा त्यांना आजूबाजूच्या वस्तूंची किंवा लोकांचं भानचं नसतं. मग तो साताऱ्याचा (Satara) असो किंवा ती काश्मीरची (Kashmir)…देशाच्या दोन वेगवेगळ्या टोकाल्या असलेल्या दोन जीवांचा नुकताच लग्नसोहळा पार पडला आहे. अजित पाटील (Ajit Patil) आणि सुमन देवी (Suman Devi) अशा या जोडप्याचं नाव आहे.

अजित पाटील हे साताऱ्याचे रहिवासी आहेत. तर सुमन देवी ही काश्मीरची रहिवसी आहे. अजित पाटील हे सैन्यात दाखल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर तैनात आहेत. जम्मूमध्ये एका मित्राच्या घरी अजित पाटील गेले होते. तेव्हा सुमन यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

लॉकडाऊनमुळे भाग्य उजळलं…

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अजित पाटील हे सुमनच्या नातेवाईकांसोबत जम्मू-काश्मीरमध्ये अडकले होते. या काळात दोघांच्या नात्यांची वीण आणखी घट्ट झाली. काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, किश्तवाडमध्ये अजित पाटील आणि सुमन देवी यांचे काश्मिरी पद्धतीने लग्न झाले. नंतर साताऱ्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न झाले. विशेष म्हणजे मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे दोघांनाही फायदा झाला आहे.