मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर आधी भडकली नात तर आता आजी जया बच्चनने व्यक्त केला संताप!

अभिनेत्री जया बच्चनही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भडकल्या आहेत. या आधी त्यांची नाव्यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विधानाचा निषेध नोंदवला होता.

    उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले तीरख सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. रावत यांच्या वक्त्यव्यानंतर सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. अनेक महिला नेत्यांनाही या वक्तव्यावर टीका केलीये.  तर अभिनेत्री जया बच्चनही मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भडकल्या आहेत. या आधी त्यांची नाव्यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विधानाचा निषेध नोंदवला होता.

     

    जया बच्चन म्हणाल्या,  अशी विधाने मुख्यमंत्र्यांना अनुकूल नाहीत. उच्च पदांवर असलेल्यांनी विचार करूनच सार्वजनिक विधान करणं आवश्यक आहे. आजच्या काळात आपण अशा गोष्टी बोलतो, त्यावरून आपली मानसिकता लक्षात येते. ही वाईट मानसिकता आहे आणि हीच मानलिकता महिलांवरील अपराधांना प्रोत्साहन देते.

    या आधी जया बच्चन यांची नात नाव्या नवेलीने सोशल मीडियावर पोस्ट करत या विधानाचा निषेध केला होता. नव्यानं सोशल मीडियावर तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्याचा स्‍क्रीनशॉट शेअर केलाय. WTF, आमचे कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी. मी अभिमानानं रिप्ड जीन्स घालणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला चांगलं वातावरण देऊ शकतात का? मी माझी रिप्‍ड जीन्स घालणार, धन्यवाद.

    काय म्हणाले उत्तराखंडचे मुख्यमंत्री

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात रावत यांनी आक्षेप घेतला आहे. आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असंही ते म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.