रेखासाठी अमिताभ बच्चन देणार होते जया यांना घटस्फोट, त्या एका गोष्टीमुळे त्या दोघांच नातं तुटता तुटता राहीलं!

अनेकदा याबाबत जया बच्चन यांनी बिग बींकडे तक्रार केली. असं म्हटलं जातं की बिग बी जया बच्चन यांना घटस्फोट देण्याचा विचार करतो होते.

    बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेत अनैतिक संबंध असणं ही बाब अगदी सामान्य समजली जाते. काही सेलिब्रिटी तर विवाहीत असतानाही दुसऱ्या कलाकारासोबत लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहतात. बॉलिवूडमध्ये गेले अनेक वर्ष हे सर्रास सुरू आहे. अगदी अमिताभ बच्चन  आणि रेखा यांचंच उदाहरण घ्या ना. विवाहित असतानाही बिग बी सदाबहार रेखा यांच्या प्रेमात पडले होते. असं म्हटलं जातं की बिग बी जया बच्चन यांना घटस्फोटही देणार होते.

    रेखा आणि अमिताभ यांनी १९७६ साली दो अंजाने या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच दरम्यान दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. पुढे त्यांनी सिललिसा, मिस्टर नटवरलाल, मुकद्दर का सिकंदर, खून पसिना यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. विशेष म्हणजे प्रत्येक चित्रटानंतर रेखा आणि बिग बींच्या अफेअरचा चर्चा वाढू लागल्या. अनेकदा याबाबत जया बच्चन यांनी बिग बींकडे तक्रार केली. असं म्हटलं जातं की बिग बी जया बच्चन यांना घटस्फोट देण्याचा विचार करतो होते.

    जया बच्चन यांनी अशी केली आयडीया

    अखेर जया बच्चन यांनी रेखासोबत थेट बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेखाला एके दिवशी जेवणासाठी घरी बोलावलं. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यामध्ये जयाजींनी रेखा यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की काहीही झालं तरी मी बिग बींना सोडणार नाही. त्यामुळं अखेर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं तुटलं. त्या रात्री रेखाला अनेकांनी बिग बींच्या घरातून रडत बाहेर जातानाही पाहिलं होतं असं म्हटलं जातं.