‘जीव झाला येडापिसा’मधील अभिनेत्याचं कोरोनामुळं निधन, सहकलाकारांची भावूक पोस्ट व्हायरल!

जीव झाला येडा पिसा मध्ये ‘विजया काकी’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट लिहली आहे

  सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं कोरोनाचा फटका बसत आहे. नुकताच मराठीतील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ मध्ये ‘भावे’ ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेता हेमंत जोशीयाचं कोरोनाने निधन झालं होतं. याबद्दलची भावुक पोस्ट करत कलाकारांनी सोशल मीडियावर लिहीली आहे.

  हेमंत जोशी यांनी कलर्स मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ मध्ये ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. ते अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. सेटवर ते नेहमी हसत खेळत असायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या सह कलाकारांना विश्वासचं बसत नाहीय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sumedha Datar (@sumedhadatar)

  जीव झाला येडा पिसा मध्ये ‘विजया काकी’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट लिहली आहे. सुमेधाने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘”भावपूर्ण श्रद्धांजली” असं लिहायला मनच धजत नाहीये हे दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटीसतत हसतमुख व्यक्तिमत्त्व कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच …”ऐश” माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास…आणि काल अचानक भावे गेले …किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत “ऐश” करा’ अशा. आशयाची ही पोस्ट लिहत सुमेधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  तर अभिनेता रोहित हळदीकर, याने म्हटलय..तीन दिवसापूर्वीचा मेसेज ‘रोह्या मी आता बरा आहे, लवकरच डिस्चार्ज मिळेल, नंतर निवांत बोलू, love you bhava’.. थट्टामस्करी शिवाय एकही दिवस गेला नाही आणि प्रत्येक सीन करताना तुम्ही appreciate केलं नाही असा एकही टेक गेला नाही..मुंबईला माझ्याकडे येणार होतात, माझ्याबरोबर स्टुडिओत  येऊन डबिंग बघणार होतात, कोल्हापूरच्या घरी आई बाबांना भेटणार होतात, माझा ‘अंतिम’ फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार होतात, पुढे अजून खूप काम करू हे ही ठरलं होतं.. असं गंडवायचं नसतं मिस्टर हेमंत जोशी.. पण तुम्ही असाल तिथेही ‘ऐश’ करत असाल ही खात्री आहे..