पाच बॉयफ्रेंड बदलल्यानंतर अभिनेत्रीने पहिल्याच प्रियकराशी पुन्हा थाटला संसार, वाचा पाचव्या लग्नाची गोष्ट!

जेनिफरच्या प्रकरणातील महत्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या सुरुवातीस तिनं बेन अफ्लेकला देखील डेट केलं आहे. अन् आता जवळपास २० वर्षानंतर ती पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडली आहे.

  हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जेनीफर लॉरेन्स. जेनिफर चित्रपटांसोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. यावेळी जेनिफर अभिनेता बेन अफ्लेकमुळं चर्चेत आली आहे. बॅटमॅन ही सुपरहिरो व्यक्तिरेखेमुळं नावारुपास आलेल्या बेनसोबत सध्या ती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतेय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jennifer Lopez (@jlo)

  या आधी वर्षभरापूर्वी ती बास्केटबॉलपटू अलेक्स रॉड्रीजसोबत राहात होती. परंतु त्यांच्यातील मतभेदांमुळं दोघांचं ब्रेकअप झालं अन् आता बेन अफ्लेकसोबत राहात आहे. जेनीफर ही आपल्या बॉयफ्रेंड्समुळं कायम चर्चेत असते. गेल्या दहा वर्षात तिनं जवळपास पाच वेळा विविध तरुणांसोबत ब्रेकअप केली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं डेव्हिड क्रूज, ओजानी नोव्हा, टॉमी मोटाल, सेन कॉम्स, विस्ली स्नाईप्स यां कलाकरांची नाव घेतली जातात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jennifer Lopez (@jlo)

  जेनिफरच्या प्रकरणातील महत्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या सुरुवातीस तिनं बेन अफ्लेकला देखील डेट केलं आहे. अन् आता जवळपास २० वर्षानंतर ती पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडली आहे. बेन अफ्लेकनं दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री जेनिफर गार्नरला घटस्फोट दिला होता. बेनचे विवाहबाह्य संबंध आहे असा आरोप तिनं त्यावेळी केला होता. तिनं घेतलेल्या अभिनेत्रीच्या नावांमध्ये जेनीफरचं देखील नाव होतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Jennifer Lopez (@jlo)