jimmy shergil

निर्बंधांकडे दुर्लक्ष करत वेब सीरिजचं शूटिंग(Shooting) केल्यामुळे बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली.

    मुंबई : कोरोना(Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  या वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत वेब सीरिजचं शूटिंग(Shooting) केल्यामुळे बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिल (Jimmy Shergill) याला पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका देखील करण्यात आली.

    अखेर या प्रकरणावर त्यानं स्वत: स्पष्टीकरण दिलं.पोलिसांनी राईचा पर्वत केला असं त्याने म्हटलं आहे.

    एका मुलाखतीत तो म्हणाला, “आम्ही सर्व नियमांचं पालन करूनच चित्रीकरण करत होतो. देशात काय चाललं आहे. याची कल्पना आम्हाला आहे. शिवाय आम्हाला आमच्या जिवाची काळजी देखील आहे. मात्र पोलिसांनी आणि त्यानंतर माध्यमांनी राईचा पर्वत केला. फारच चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवल्या गेल्या.”

    अभिनेता जिमी शेरगिल पंजांबमध्ये ‘युअर ऑनर 2’ या वेब सीरिजचं शूटिंग करत होता. एका शाळेमध्ये या वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. यावेळी नाईट कर्फ्यू असतानाही रात्री आठ वाजल्यानंतर शूटिंग सुरु असल्याने पोलिसांनी सेटवर धडक दिली. यावेळी सेटवर शंभर लोक उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाच्या नियमावलीचं पालन न केल्याने जिमी शेरगिलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पंजाबमध्ये देखील गेल्या काही दिवसात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच प्रशासनाने कडक प्रतिबंध लागू केले आहेत. अशातही रात्री आठनंतर शूटिंग सुरू असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली होती.