धूम मचा ले धूम ….जॉन अब्राहमचा हा बाईक स्टंट बघताना उपस्थितांच्या अंगावर आला काटा, व्हिडिओ व्हायरल!

चित्रपटातील अक्शन सीन बघून तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं आहे. या व्हायरल होणाऱ्या सीनमध्ये जॉन अब्राहम आग लागलेली बाईक चालवताना दिसत आहे. याच दरम्यान जॉनला मारण्यासाठी बॉम्ब ब्लास्टही करण्यात आला. हा अक्शन सीन बघून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले.

    अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भुमिका असणारा ॲटॅक चित्रपटाचं शुटींग सध्या अलीगढमधील धनीपुर विमानतळावर सुरू आहे. त्यामुळे या विमानतळावरीव ३ दिवस विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जॉन अब्राहमला बघायला आणि शुटींग बघायला अलीगढमधील लोकांनी एकच गर्दी केली आहे. सध्या या चित्रपटाच्या शुटींगचे काही सीन्स व्हायरल होत आहेत.

    चित्रपटातील ॲक्शन सीन बघून तिथल्या लोकांना आश्चर्य वाटलं आहे. या व्हायरल होणाऱ्या सीनमध्ये जॉन अब्राहम आग लागलेली बाईक चालवताना दिसत आहे. याच दरम्यान जॉनला मारण्यासाठी बॉम्ब ब्लास्टही करण्यात आला. हा ॲक्शन सीन बघून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले.

    जॉनला बघायला आलेल्या प्रेक्षकांना जॉनने नाराज केलं नाही. जॉन हात हालवत लोकांना अभिवादन केलं. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढला. या चित्रपटात जॉन बरोबर जॅकलीनही दिसणार आहे. लवकरच जॅकलीन अलीगढमध्ये दाखल होईल. यासाठी जॅकलीन आणि जॉनचे एकत्र सीन असणार आहेत.