john_abraham

अभिनेता जॉन अब्राहमला ‘सत्यमेव जयते २’ च्या सेटवर दुखापत झालीये.. या चित्रपटाचं सध्या वाराणसीत चित्रीकरण सुरु असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे.

अभिनेता जॉन अब्राहमला

दुखापत झालीये.. या चित्रपटाचं सध्या वाराणसीत चित्रीकरण सुरु असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे.

या आधी ‘सत्यमेव जयते २’ चं लखनौमध्ये चित्रीकरण सुरू होतं. हे चित्रीकरण पार पडल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी वाराणसीत दाखल झाली. वाराणसीत चित्रपटातील अक्शन सीनचे शूट सुरू होतं. यावेळी शूटच्या पहिल्याच दिवशी जॉनला दुखापत झाली. त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आलं आहे. चेत सिंह किल्ल्याजवळ जॉन अॅक्शन सीन शूट करत होतो. त्याचवेळी त्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे जॉनला दुखापत झाल्याचं कळताच लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसंच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग असून तो नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.