ईदच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर युद्ध, कारण जॉन अब्राहम देणार भाईजानच्या सिनेमाला टक्कर!

अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर ईदीच्याच दिवशी येणार आहे. तर त्याच दिवशी जॉनच्या ‘सत्यमेव जयते २’ प्रदर्शित होईल.

  बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात प्रदर्शित होणार आहे. अखेर चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीये. हा चित्रपट १३ मे ला प्रदर्शित होणार आहे म्हणजेच ईदच्या दिवशी. या आधी हा चित्रपट १४ मे ला प्रदर्शित होणार होता.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by John Abraham (@thejohnabraham)

  अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर ईदीच्याच दिवशी येणार आहे. तर त्याच दिवशी जॉनच्या ‘सत्यमेव जयते २’ प्रदर्शित होईल. ज्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक दिवस पुढे ढकलली होती. मात्र, आता ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते २’ एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.

  जॉन अब्राहमने आपल्या चित्रपटाशी संबंधित एक नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. हे पोस्टर शेअर करताना जॉनने लिहिले की, ‘ईद पर सत्या बनाम जय लड़ेंगे इस साल, दोनों भारत मां के लाल!’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आपल्याला दोन जॉन अब्राहम दिसत आहेत. ज्यामुळे असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात जॉन अब्राहम या चित्रपटात दुहेरी भुमिकेत दिसू शकतो.