johny depp

हॅरी पॉटर’चा प्रिक्वेल ‘फॅन्टास्टिक बिस्ट’(fantastic beast) या चित्रपटामधून अभिनेता जॉनी डेपची(johny depp) हकालपट्टी करण्यात आली आहे. जॉनी डेपवर त्याची घटस्फोटित पत्नी अभिनेत्री ॲम्बर हर्ड हिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सने आपल्या प्रोजेक्ट्समधून जॉनी डेपला बाहेर काढले आहे.

‘हॅरी पॉटर’चा प्रिक्वेल ‘फॅन्टास्टिक बिस्ट’(fantastic beast) या चित्रपटामधून अभिनेता जॉनी डेपची(johny depp) हकालपट्टी करण्यात आली आहे. जॉनी डेपवर त्याची घटस्फोटित पत्नी अभिनेत्री ॲम्बर हर्ड हिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे वॉर्नर ब्रदर्सने आपल्या प्रोजेक्ट्समधून जॉनी डेपला बाहेर काढले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटामधील फक्त एका सीनसाठी जॉनीला ७४ कोटी २४ लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं.

जॉनी डेप हा सुपरस्टार अभिनेता आहे. तो कुठलाही चित्रपट स्वीकारताना त्यामध्ये त्याचे सीन किती आहेत? यांचा विचार करुन पैसे घेतो. ‘फॅन्टास्टिक बिस्ट’ प्रोजेक्टमध्ये वॉर्नर ब्रदर्स या निर्मिती संस्थेने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. ही संपूर्ण चित्रपट मालिका गॅलिअर्ट ग्रिंडलवर्ड ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॉनी डेपभोवती फिरते. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला एका सीनसाठी १० मिलिअन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४ कोटी २४ लाख रुपये दिले होते. मात्र ॲम्बर हर्डच्या आरोपांमुळे त्याची चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली.

जॉनीला ‘फॅन्टास्टिक बिस्ट’मधून काढल्यामुळे चाहते प्रचंड नाराज असल्याने ते वॉर्नर ब्रदर्सने निर्मिती केलेल्या प्रोजेक्ट्सवरच बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.