जॉन अब्राहमने शेअर केला न्यूड फोटो, चाहत्यांना पडले भलतेच प्रश्न, आता होतोय ट्रोल!

काही जणांनी जॉनला विचारले आहे तुझ्याकडे कपडे नाहीत का? तर काही म्हणतं आहेत जा कपडे घालून ये…यापेक्षाही जास्त कुतूहल चाहत्यांना हे जाणून घेण्यामध्ये जास्त आहे की, हा फोटो नेमका कोणी काढला? यात जास्त रस आहे.

  अभिनेता जॉन अब्राहम सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव नसतो. जॉन सोशल मीडियावर फारसे फोटो आणि व्हिडिओ सहसा शेअर करत नाही. परंतू सकाळी- सकाळी जॉनने शेअर केलेल्या फोटोमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्याचा हा फोटो पाहून चाहते आवाक झाले.

  View this post on Instagram

  A post shared by John Abraham (@thejohnabraham)

  काय आहे फोटो

  जॉनने आपल्या न्यूड फोटो शेअर केला आहे, या फोटोत जॉन सोफ्यावर बसलेला दिसत आहे आणि तेही कपडे न घालता. त्याने आपल्या मांडीवर उशी ठेवली आहे आणि तो कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं आहे की, “मी कपाटाची वाट बघतोय…जॉनचे ऍब्स, मसल्स पाहून चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. मात्र, काही लोकांनी जॉनचा हा फोटो ट्रोल देखील केला आहे.

  View this post on Instagram

  A post shared by John Abraham (@thejohnabraham)

  चाहत्यांना पडले प्रश्न

  काही जणांनी जॉनला विचारले आहे तुझ्याकडे कपडे नाहीत का? तर काही म्हणतं आहेत जा कपडे घालून ये…यापेक्षाही जास्त कुतूहल चाहत्यांना हे जाणून घेण्यामध्ये जास्त आहे की, हा फोटो नेमका कोणी काढला? यात जास्त रस आहे.

  जॉनने ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिगं सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी जॉनने या चित्रपटाची माहिती देत शूटिंग सुरू झाल्याचे चाहत्यांना सांगितले होते. मोहित सुरीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात दिशा पटनी, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर हे कलाकारही जॉनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जॉनचा सत्यमेव जयते हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.