BA Raju

चित्रपट निर्माते बीए राजू(BA Raju Death) यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर दिली आहे.

    हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू (BA Raju Death)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी हैदराबादच्या रुग्णालयात पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

    बीए राजू यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर दिली आहे.  “अत्यंत दु:खाने मी माझ्या वडिलांच्या निधनाची घोषणा करत आहे. डायबेटिस आणि हार्ट अटॅकमुळे  त्यांचे अचानक निधन झाले, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. आमच्या ह्रदयात ते कायम सुपरहिट राहतील.” असे त्यांचा मुलगा बी. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

    अभिनेता चिरंजीवीनेही बीए राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    अभिनेता महेश बाबूनेही ट्विटरवर बीए राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


    दोन वर्षांपूर्वी राजू यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या.