संगीतप्रेमींसाठी ‘कह रहा’ अल्बमच्या रुपाने अनोखा नजराणा!

जीवनातील प्रवासात मिळणारे धडे हे आपल्या ह्दयाला स्पर्श करणाऱ्या काव्यांना अतिशय खास अशा रेट्रो स्टाईलमध्ये गाण्यांच्या रुपाने सादर करण्यात आलेली आहे.

  अनेक प्रसिध्द फिल्म आणि अल्बमला आपल्या सुरेल्या संगीताने सजवणारे आणि संगीतकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीत सर्वांधिक मागणी असलेले टबी उर्फ इंद्रजित शर्मा हे “ कह रहा !”    या गाण्यांच्या अल्बमच्या माध्यमातून पार्श्वगायक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. त्यांचा हा अल्बम येत्या ९ जूनला संगीतप्रेमींच्या भेटीला येत आहे.

  मधुर गाण्यांनी सजलेला “ कह रहा ” हा अल्बम प्रामुख्याने मुंबई ते केरळदरम्यान मनमोहक नैसर्गिक ठिकाणांच्या शोधात आपल्या गाडीवरुन आपल्याच अनोख्या मस्तीत प्रवास करणाऱ्या एका मुसाफिराचा सादर केलेला संगीतमय प्रवास आहे. या अल्बममधील गाण्यांना अनेक इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या सुरांचा साज चढविण्यात आलेला आहे. बंजारा स्टाईलमध्ये असलेली ही गाणी टबी यांनी आपल्या मधुर आवाजाने सजविली आहे. जीवनातील प्रवासात मिळणारे धडे हे आपल्या ह्दयाला स्पर्श करणाऱ्या काव्यांना अतिशय खास अशा रेट्रो स्टाईलमध्ये गाण्यांच्या रुपाने सादर करण्यात आलेली आहे.

  इंद्रजित शर्मा हे आघाडीचे संगीतकार असून त्यांनी भाग मिल्का भाग, राझ्झी आणि छपाक, गुजारीश, ढोलकी ( मराठी ) आणि विश्वआरुपम ( तमिळ ) या चित्रपटासह जवळपास शंभरहुन अधिक गाण्यांना आपल्या संगीताचा साज चढविलेला आहे. आपल्या तीस वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चाटबस्टर अल्बमची निर्मिती केली आहे. त्यात शंकर महादेवन यांचा ब्रेथलेस आणि शुभा मुदगल यांचा मन के मंजिरे यासारख्या गाजलेल्या अल्बमचा समावेश आहे.

   लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-एहसान-लॉय आणि लुईस बँक्स यासारख्या प्रसिध्द संगीतकारांसमवेत त्यांनी काम केलेले असुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कलाकारांबरोबर त्यांनी संगीतातील नवनवीन अविष्कार पेश केलेले आहेत. संगीताच्या विविध प्रकारांचा त्यांनी खुबीने वापर केलेला आहे. अगदी भक्ती संगीतापासून ते म्युझिक चार्टवर राज्य करणाऱ्या बॉलीवूडच्या गाण्यांच्या माध्यमातून आपली कला जगाला सादर केलेली आहे. आपल्या गाण्यात सुर आणि ताल यांचा अलग नजराना पेश करण्याबाबत त्यांच्या ख्याती आहे.   मुंबईच्या संस्कृतीत जन्मापासून वाढलेले टबी यांनी फंकट्युब या आपल्या पहिल्या अल्बमच्या माध्यमातून जाझ संगीतकार म्हणून आपला ठसा सर्वप्रथम उमटविला. शर्मा यांच्या बॅण्डने 2018 मध्ये पदार्पण केले.  वयाच्या सोळाव्या वर्षी आपले पहिले गाणे सजविणारे शर्मा हे तरुण संगीतकारांपैकी एक ठरलेले आहेत.

   कह रहा हा अल्बम संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी अनोखा नजराणा नक्कीच ठरणार आहे. सोनम सैनी यांनी लिहिलेली गाणी ही जीवनातील धडपड, कष्ट यांची भिती न बागळता आपली स्वप्न पुर्ण करणाऱ्या एका अनोख्या जिद्दीचा प्रवास आहे. नील मुखर्जी यांचे गिटार आणि विजय बेनगेल यांच्या गाण्यांचे मिक्सही या गाण्यांमध्ये संगीतप्रेमींना ऐकण्यास मिळणार आहे.

   कह रहा हा अल्बम केवळ कानांसाठीच सुमधुर संगीताचाच नजराना नसुन संगीतप्रेमींच्या डोळ्यांनासुध्दा एक संदुर चित्रकृती राहणार आहे. समुधरूपणा, बँकग्राऊंडला वापरण्यात आलेले ड्रमचे बीटस् आणि टबी यांचा कर्णमधुर आवाज ह्दयाला स्पर्श करताना हा अल्बम आपल्या दीर्घ प्रवासातील एक प्रकारे सहप्रवासीच ठरणार आहे.  डिजीटल स्वरुपातील सर्व प्रकारच्या प्लॅटफॉमवर येत्या हा अल्बम नऊ जूनला प्रकाशित केला जाणार आहे.