कैलाश खेर यांनी गायलं ‘या’ मराठी मालिकेचं शीर्षकगीत!

'गाथा नवनाथांची'  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. 

    कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

    ‘गाथा नवनाथांची’  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.

    या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे.