Faridabad Murder Case

कंगनाने कठोर शब्दात ट्वीट करून लिहिले की, 'फ्रान्समध्ये घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण जग विस्मयचकित झाले आहे, तरीही या जिहादींना कायद्याची लाज वा भीती नाही. एका हिंदू मुलीवर तिच्या कॉलेजबाहेर प्रकाशात गोळ्या घालण्यात आल्या कारण त्याने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. कृती त्वरित होणे आवश्यक आहे. '

दिल्ली : फरीदाबादमध्ये (Faridabad murder Case) बीकॉम अंतिम वर्षात शिकत असणारी विद्यार्थिनी निकिता तोमरच्या दिवसा-ढवळ्या खून केल्याबद्दल कंगना रनौत खूप चिडली आहे. या हत्येवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी कडक प्रत्युत्तरात ट्विट केले आहे. एक दिवस आधी फरीदाबादच्या बल्लभगड येथील निकिता या विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत तौसिफ नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केली. या प्रकरणानंतर संपूर्ण देशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.(Kangana expresses anger over Faridabad murder)

कंगनाने कठोर शब्दात ट्वीट करून लिहिले की, ‘फ्रान्समध्ये घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण जग विस्मयचकित झाले आहे, तरीही या जिहादींना कायद्याची लाज वा भीती नाही. एका हिंदू मुलीवर तिच्या कॉलेजबाहेर प्रकाशात गोळ्या घालण्यात आल्या कारण त्याने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. कृती त्वरित होणे आवश्यक आहे. ‘

दुसर्‍या ट्विटमध्ये कंगना रनौत यांनी निकिताच्या धाडसाचे कौतुक केले आणि तिची तुलना राणी लक्ष्मीबाईशी केली. त्यांनी लिहिले, ‘निकिताची शौर्य रानी लक्ष्मीबाई किंवा पद्मावतीपेक्षा काही कमी नाही. जिहादी मारेकरी तिच्या प्रेमात वेडे होते आणि तिला आपल्याबरोबर घेऊन जायचे होते. जर तिला जगण्याची इच्छा असेल तर ती तिच्या वासनेसमोर आपले हात ठेकवू शकली असती परंतु तिने मरणाला प्राधान्य दिले. देवी निकिता प्रत्येक हिंदू महिलेच्या सन्मान आणि अभिमानासाठी उभी राहिली. ‘