ट्विटरने हाकलून देताच, ‘या’ अ‍ॅपने कंगनाच केलं जोरदार स्वागत, पोस्ट शेअर करत केलं WELCOME, जाणून घ्या त्या APPबद्दल!

ही कंगनाची पहिली ‘Koo’ पोस्ट आहे. तिने ‘Koo’ला स्वत:च्या घरासारखे आणि अन्य अ‍ॅपला भाड्याचे म्हटले होते. जे अगदी योग्य आहे,’

  ट्विटरने कंगनाचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. ट्विटर अकाऊंट बॅन झाल्यानंतर कंगनाचे चाहते निराश झाले होते. पण ‘Koo’ अ‍ॅपने मात्र कंगनाचे जोरदार स्वागत केले आहे.

  ‘Koo’चा सीईओ व सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्णनने सोशल मीडियावर कंगनाच्या ‘कू’ पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला. हा स्क्रिनशॉट शेअर करत, अप्रमेय राधाकृष्णनने कंगनाचे स्वागत केले. ‘ही कंगनाची पहिली ‘Koo’ पोस्ट आहे. तिने ‘Koo’ला स्वत:च्या घरासारखे आणि अन्य अ‍ॅपला भाड्याचे म्हटले होते. जे अगदी योग्य आहे,’ असे राधाकृष्णनने लिहिले.

  फेब्रुवारी महिन्यातच घेतली होती एन्ट्री

   ‘सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपले घर आपलेच असते…,’ असे कंगनाने लिहिले होते.

  काय आहे koo

  हे ट्विटरसारखच एक अ‍ॅप आहे.  या अ‍ॅपला आत्मनिर्भर अ‍ॅप चॅलेंजचा अवार्डही मिळाला आहे. हे अ‍ॅप अप्रमेय राधाकृष्णन आणि मयांक भिडवटका  यांनी विकसीत केलं आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, पंजाबी, ओडिशी, आसामी अशा अनेक भाषेत ही अ‍ॅपलॉन्च करण्यात आली आहे. कनेक्ट विद इंडियन्स इन इंडियन लँग्वेज, अशी या अ‍ॅपची टॅगलाईन आहे.