kangana

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

पुन्हा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आणि वादा सापडणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे अभिनेत्री कंगान रणावतला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.  पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कंगनाला ७ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आला आहे. या सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल असं म्हटलं आहे.  “आंदोलन करणं हा प्रत्येक व्यक्तीचा संविधानिक विशेष अधिकार आहे. मात्र, कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे या वृद्ध महिलेसह देशातील अन्य महिलांचादेखील अपमान झाला आहे. त्यामुळे कंगनाने या प्रकरणी माफी मागावी. तसंच तिने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल”, असं हाकम सिंह यांनी पाठवलेल्या नोटीशीत नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हणालेली कंगना…

शेतकरी आंदोलनातील एक वृद्ध महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. मात्र, कंगनाने केलेलं हे ट्विट चुकीचं असल्याचं ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कंगना कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यापूर्वी अनेकवेळा कंगना ट्रोल झालीये.