सत्तेसाठी शिवसेना ‘सोनिया सेना’ झाली : कंगना रणौत

ज्या विचारसरणीवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली होती, ती आज सत्तेसाठी सोनिया झाली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका, असं कंगना रणौतनं ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangana Ranaut)  मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली गेली. तसेच काल बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनाने पालिकेवर (BMC) आणि सरकारवर ( State Government) निशाणा साधला होता. परंतु आता कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना (Sonia Sena) झाल्याचं म्हटलं आहे.

ज्या विचारसरणीवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली होती, ती आज सत्तेसाठी सोनिया झाली आहे. ज्या गुंडांनी माझ्या नकळत माझं घर तोडलं, त्यांना स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणू नका. संविधानाचा इतका अपमान करू नका, असं कंगना रणौतनं ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगना रणौतच्या पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.

मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची अवस्था व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा व्हिडीओ पोस्ट केला. यात मुखमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, उद्धव ठाकरे तुम्हांला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठा बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखे नसते.