kangana

ट्विटरच्या या निर्णयानंतर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टावर फोटो शेअर करत कंगनाने ट्विटरच्या कारवाईनंतर तिचं मत मांडलं आहे.

    सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करणं अखेर अभिनेत्री कंगना रणावतला महागात पडलं आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलंय. कंगनाने बंगाल निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमुळे ती अधिक चर्चेत आली. यानंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.

    ट्विटरच्या या निर्णयानंतर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टावर फोटो शेअर करत कंगनाने ट्विटरच्या कारवाईनंतर तिचं मत मांडलं आहे. कंगना म्हणालीय, “मी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्विटरने माझं अकाऊंट बंद केलं.”

     

    पुढे बोलताना कंगना म्हणाली “ट्विटरने फक्त माझा मुद्दा सिद्ध केला आहे की ते जन्माने अमेरिकन आहेत. गहुवर्णीय लोकांना गुलाम बनवणं हा आपला हक्क आहे असं अमेरिकेला वाटतं. आपण काय विचार करावा, आपण काय बोलावं आणि काय करावं हे ते ठरवतात. माझ्या सिनेमाच्या मदतीने देखील मी माझं मत मांडू शकते.” असं कंगना म्हणाली आहे.

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्विट केले होते. सोमवारी सायंकाळी कंगाने केलेल्या या ट्विट्समध्ये अनेक वादग्रस्त आरोप करण्यात आलेले. त्यानंतर आज सकाळी कंगनाचं ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.