‘हा खेळ दिर्घकाळ चालणार नाही, येत्या काळात हे भ्रष्टाचारी सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल’ कंगनाची सरकारवर सडकून टीका!

“येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे. मी आणि माझं कुटुंब या भूमीवर प्रचंड प्रेम करते. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.”

    राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अडचणीत सापडले. “दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सीआययूचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना दिले होते. त्यातले ४० ते ५० कोटी रुपये मुंबईतल्या १७५० बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा होऊ शकतात, असं देखील गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितलं होतं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. हे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री कंगना राणावतने या प्रकरणात उडी घेतली आहे. “मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे अन् मी देशभक्त” असा टोला तिनं लगावला आहे.

     

    “येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे. मी आणि माझं कुटुंब या भूमीवर प्रचंड प्रेम करते. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.” अशा आशयाचं कंगनाने ट्विट केलं आहे.

    “जेव्हा मी महाराष्ट्र सरकारविरोधात आवाज उठवला तेव्हा मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. माझ्यावर टीका झाली. पण जेव्हा मी माझ्या शहरासाठी आवाज उठवला तेव्हा त्यांनी माझं घर तोडलं. तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता. पण आता त्यांच्या खेळ दिर्घकाळ चालणार नाही.” अशा आशायाची दोन् ट्विट्स करुन कंगनानं राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे.