kangana

अभिनेत्यांना तुझ्यासोबत एका चित्रपटात काम करायला भीती वाटते का? असा प्रश्न कंगनाला विचारता, “कंगना इरफान खानबद्दल बोलली, अभिनेते मला असे म्हणतात. ते माझ्या तोंडावर सांगतात की आम्हाला तुझ्यासोबत काम करायची भीती वाटते.

  सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. अभिनेत्री कंगना राणात तीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती मोठ्याप्रमाणावर ट्रोलही होते. कंगनाची आता एक जूनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत कंगनाने दिवंगत अभिनेता इरफान खानबद्दल सांगितलं आहे.

   ‘तनु वेड्स मनु’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगना आणि इरफान या दोघांमध्ये एकत्र काम करण्यावर चर्चा झाली या बद्दल कंगनाने सांगितले आहे. “मी त्यांना सांगितले की आपण चित्रपटाला सुरुवात केली पाहिजे. तर इरफान म्हणाले, हो पण ‘एक म्यान में दो तलवार कैसी रहेगी’,  मला वाटलं की ही स्तुती आहे. इरफान सरांसारख्या अभिनेत्याने माझ्याबरोबर काम केलेले मला आवडेल. कोणीतरी जो एक चांगली स्पर्धा देईल. मला याचे खूप चांगलं वाटलं.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  अभिनेत्यांना तुझ्यासोबत एका चित्रपटात काम करायला भीती वाटते का? असा प्रश्न कंगनाला विचारता, “कंगना इरफान खानबद्दल बोलली, अभिनेते मला असे म्हणतात. ते माझ्या तोंडावर सांगतात की आम्हाला तुझ्यासोबत काम करायची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की मी एखाद्या चित्रपटाला होकार दिला तर माझी भूमिका अधिक रंगवून छान लिहिली जाईल.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.