कंगनाच्या वाढदिवसानिमित्त ट्रेलर पाठोपाठ आणखी एका चित्रपटाचा लूक प्रदर्शित, चेहऱ्यावरील स्मित हास्याच्या चाहते पडले प्रेमात!

“प्रिय तेजस, तुझे पंख पसरवत उंच भरारी घे, आज आणि नेहमीच. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कंगना” अशा आशयाचे कॅप्शन आरएसव्हीपी मूव्हिजने दिेले आहे.

  अभिनेत्री कंगना राणावतचा आज ३४ वा वाढदिवस. आज कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आगामी चित्रपट थलायवी चा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता त्या पाठोपाठ कंगनाचा आगामी चित्रपट ‘तेजस’ मधील कंगनाचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या लूकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तेजसच्या लूकमधील कंगनाचं स्मित हास्य सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.

   

  “प्रिय तेजस, तुझे पंख पसरवत उंच भरारी घे, आज आणि नेहमीच. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कंगना” अशा आशयाचे कॅप्शन आरएसव्हीपी मूव्हिजने दिेले आहे. कंगनाचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आरएसव्हीपी मूव्हिजने कंगनाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत कंगनाने भारतीय वायू सेनेचा गणवेश परिधान केला आहे. तिच्या हातात पेन्सिल असून ती ट्रेनिंग रूममध्ये बसल्याचे दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात केली होती. यात सैन्य दलाच्या साहसाची कथा मांडली जाणार आहे. या चित्रपटात एका महिला वैमानिकेच्या साहसाची कहाणी दाखवण्यात आली आहे.