‘या’ दिवशी प्रदर्शित होणार कंगनाचा बहुचर्चित ‘थलैवी’, खास पोस्ट शेअर करत दिली माहिती!

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अभिनेत्री जयललिता यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा 'थलैवी' बिग स्क्रीनवरच प्रदर्शित होणार असल्याचं जणू आश्वासनच कंगनानं या पोस्टद्वारे दिलं आहे.

  एका मागोमाग एक राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या कंगना रणौतचे चाहते नेहमीच तिच्या चित्रपटांची आतुरतेनं वाट पहात असतात, पण ‘थलैवी’ या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची त्यांना जरा जास्तच प्रतीक्षा करावी लागली आहे. दुसऱ्या लॅाकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीला येऊ न शकलेल्या ‘थलैवी’च्या प्रदर्शनासाठी सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. यापूर्वी हा चित्रपट २३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण लॅाकडाऊनमुळं लांबणीवर गेला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  आता १० सप्टेंबर ही तारीख घोषित करण्यात आली आहे. कंगनानं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. आयकॅानिक पर्सनॅलिटी असलेल्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अभिनेत्री जयललिता यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा ‘थलैवी’ बिग स्क्रीनवरच प्रदर्शित होणार असल्याचं जणू आश्वासनच कंगनानं या पोस्टद्वारे दिलं आहे. या निमित्तानं तमिळ सिनेसृष्टी आणि तमिळनाडूतील राजकीय रामायण पडद्यावर येणार आहे.

  या चित्रपटात जयललितांच्या जीवनातील ३० वर्षांचा कालावधी पहायला मिळणार असल्याचं समजतं. विष्णू वर्धन इंदूरी आणि शैलेंद्र आर. सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही एकाच वेळी रिलीज होणार आहे.