kanagana ranaut in bjp

कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना अ‍ॅडव्होकेट सुमित चौधरी यांनी ईमेलमार्फत तक्रार पाठविली. त्यांनी बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप केला आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आलं आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंरगानेच अकाऊंट ट्विटरने निलंबित केलं आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर या अभिनेत्रीने काही वादग्रस्त ट्विट केले होते. यासाठी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

    वादग्रस्त ट्विटनंतर तिच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल कंगना राणावत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना अ‍ॅडव्होकेट सुमित चौधरी यांनी ईमेलमार्फत तक्रार पाठविली. त्यांनी बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप केला आहे.

    काय म्हणालेली कंगना

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘बंगालदेशी आणि रोहिंग्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने आहेत. हे स्पष्टपणे दर्शवते की हिंदू तेथे बहुसंख्य नसतात आणि आकडेवारीनुसार बंगाली मुस्लिम अत्यंत गरीब आणि वंचित आहेत. हे दुसरे काश्मीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कंगनाने केली होती. अभिनेत्रीने राज्यात हिंसाचाराचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे.