मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही, कंगना राणावतचं ट्विट होतय व्हायरल!

गेल्या काही दिवसात कंगना सतत देशीतील घडामोडींवर तिचं मत सोशल मीडियावर मांडत असते. नुकतच कंगनाने एक ट्विट करत तिला वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे

  धाकड गर्ल कंगना राणावत सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचं मत मांडत असते.  तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच ती चर्चेत राहते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.  गेल्या काही दिवसात कंगना सतत देशातील घडामोडींवर तिचं मत सोशल मीडियावर मांडत असते.

  नुकतच कंगनाने एक ट्विट करत तिला वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणालीय, “मोदींना नेतृत्व कसं करावं हे कळत नाही, कंगनाला अभिनय करता येत नाही, सचिनला बॅटिंग कशी करावी ठाऊक नाही आणि लता दीदींना गाता येत नाही, मात्र या ट्रोलर्सना सगळं माहित आहे.” असं म्हणत कंगनाने युजर्सचा ‘चिंदी’ असा उल्लेख केला आहे.

   

  पुढे कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, ” मोदीजी कृपया राजीनामा द्या आणि विष्णू अवतारातील एखाद्या ट्रोलरला पुढली पंतप्रधान बनवा.” असं ती म्हणाली आहे. ट्रोल करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर देखील कंगनाला नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलं आहे. एका युजरने म्हंटलं, तू देशासाठी किती मदत केली आहेस? किती योगदान दिलं आहेस? असा सवाल विचारला आहे.

   

  तर दुसरा युजर म्हणाला, सचिन आणि लताजींबद्द्ल त्यांचा समावेश करू नको. सचिनला क्रिकेट खेळता येतं आणि लताजींना गाता येतं. पण तू आणि मोदीची उत्तम अभिनय जाणता, आपले पंतप्रधान एक लीडर नसून उत्तम अभिनेते आहेत.”