kangana ranavat

अभिनेत्री कंगना रणावतने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रीया दिली आणि नेहमीप्रमाणे ट्रोल झाली. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या एका वयोवृध्द महिलेची खिल्ली उडवणारे ट्विट तीनं केलं. काही वेळाने ते तीने ट्विट डिलीटपण केलं. मात्र तोपर्यंत स्क्रीन शॉर्ट व्हायरल झाले. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली. कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरूद्वाराच्या एका सदस्याने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी आंदोलनातील एक वृद्ध महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणावतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली होती. मात्र, कंगनाने केलेलं हे ट्विट चुकीचं असल्याचं ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

काय आहे नोटीसीमध्ये

नोटीसीमध्ये म्हटलं आहे की, मन्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन आहे. आम्ही तुमच्या ट्विटर अकाऊंटवर लक्ष ठेऊन आहोत. तुम्ही आंदोलनात सहभागी झालेल्या महिलेच्या विरोधात ट्विट केलं. तुमच्या ट्विटमध्ये अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलाय. आपण केलेलं हे ट्विट प्रसिध्दीच्या दृष्टीने करण्यात आलय. आपण शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी टाकण्याचं काम करीत आहात. या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. यासाठी तुम्ही बिनशर्त माफी मागावी. असे न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.