कंगनाचा पुन्हा थयथयाट; रणबीरला म्हणाली ‘रेपिस्ट’

मुंबई. इंडस्ट्रीतील दिग्गजांना कायमच लक्ष करणारी अभिनेत्री कंगना रणौत हीच ट्विटरच्या माध्यमातून परत एकदा थयथयाट पाहायला मिळाला. यावेळी रणबीर कपूर, दीपिका पदुकोण हे कलाकार कंगनाच्या रडारवर आहेत.

या दोघांवरही कंगनाने खोचक टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. रणबीरचा उल्लेख ‘सिरियल स्कर्ट चेजर’ आणि दीपिकाला थेट ‘सायको’, असे  म्हणत कंगनाने त्या दोघांनाही निशाण्यावर घेतले आहे. एका ट्विटर युजरच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने तिखट भाषा वापरत या दोन्ही आघाडीच्या सेलिब्रिटींना खडे बोल सुनावले.

‘रणबीर कपूर हा सिरियल स्कर्ट चेजर आहे, पण त्याला रेपिस्ट म्हणण्याची कोणाचीही हिंमत नाही. तर, दीपिका ही स्वयंघोषित मानसोपचाराची रुग्ण आहे. पण तिला कोणीही सायको म्हणत किंवा चेटकीण म्हणत नाही. ही नावे  फक्त कलाविश्वात बाहेरुन येणाऱ्या अद्वितीय व्यक्तींसाठी राखीव आहेत जे लहान शहरांतून आणि सर्वसामान्य कुटुंबांतून आले आहेत.