अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या, संशय येऊ नये म्हणून भावाचे अवयव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पुरले!

आरोपींनी राकेशला चाकूने ठार मारले. नियाज अहमद आणि बाकीच्यांनी एक दिवस नंतर मृतदेह कापला आणि  हुबळी शहरातील अनेक भागात पुरला.

  कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला तिच्याच भावाच्या हत्येच्या आरोपाखाली हुबळी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनायाने राकेश कटवे यांना ठार मारले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या हत्येप्रकरणी आणखी ४ लोकांवर आरोप केले गेले आहेत. देवरागुडीहलच्या जंगलात राकेशचे डोके सापडले तर उरलेला मृतदेह हुबळी आणि गॅडग रोड येथे सापडला अशा माहिती पोलिसांनी दिली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shanaya (@its_shanayaofficial)

  वृत्तानुसार, धारवाड जिल्हा पोलिसांनी नियाझहमाद कटिगार (२१), तौसिफ चन्नापूर (२१), अल्ताफ मुल्ला (वय २४) आणि अमन गिरणीवाले (१) यांचा समावेश असलेल्या आणखी चार संशयितांची ओळख उघड केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shanaya (@its_shanayaofficial)

  राकेशची ९ एप्रिलला त्याच्याच घरात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर  शनाया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळीला गेली होती. आरोपींनी राकेशला चाकूने ठार मारले. नियाज अहमद आणि बाकीच्यांनी एक दिवस नंतर मृतदेह कापला आणि  हुबळी शहरातील अनेक भागात पुरला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shanaya (@its_shanayaofficial)

   

  शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली आणि तीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शनायाने राघवन्का प्रभु दिग्दर्शित ‘इदम प्रेमम जीवनम’ या चित्रपटाद्वारे २०१८ मध्ये कन्नड इंडस्ट्रीत प्रवेश केला.