कपिल शर्माने अनायराचा क्यूट Video केला शेअर, पण कमेंट येताच केलं असं काही….

१२ डिसेंबर २०१८ ला कपिलने गिन्नी चतरथशी लग्न केलं. लग्नाच्या एक वर्षानंतर, २०१९ मध्ये गिन्नीने अनयाराला जन्म दिला. अलीकडेच कपिल पुन्हा एकदा वडील झाला आहे आणि यावेळी त्यांना एक मुलगा आहे.

    कपिल शर्माची मुलगी अनायराचा एका व्हिडिओची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा रंगली आहे. तिचा हा क्यूट व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये ती यो यो हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कपिलने मुलीचा हा लेटेस्ट व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनायरा रॅपर यो यो हनी सिंगचे गाणं ‘जिंगल बेल्स’वर डान्स करताना दिसते आहे. पण काही वेळातच कपिलने हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून डिलीट केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    कपिल शर्मा अनेकदा आपल्या मुलीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ही आहे आमची छोटीशी रॉकस्टार यो यो हनी सिंगच्या ‘जिंगल बेल्स’वर डान्स करताना. असं कॅप्शन देत कपिलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कपिलची मुलगी खूपच क्यूट आहे असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून नेहमीच सांगत असतात. कपिलची मुलगी अनायरा नुकतीच १० डिसेंबरला एक वर्षांची झाली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

    १२ डिसेंबर २०१८ ला कपिलने गिन्नी चतरथशी लग्न केलं. लग्नाच्या एक वर्षानंतर, २०१९ मध्ये गिन्नीने अनयाराला जन्म दिला. अलीकडेच कपिल पुन्हा एकदा वडील झाला आहे आणि यावेळी त्यांना एक मुलगा आहे. कपिल शर्माने वडील होण्याची खुशखबर सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. अद्याप मुलाच नाव कपिलने जाहीर केलं नाही.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)