करण जोहरचे चाहते होतायत कमी, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाला लोक करतायत फॉलो

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यामुळे आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येसाठी घराणेशाहीला जबाबदार म्हटले जात आहे. त्यातही करण जोहर जास्त टीकेचा धनी ठरत आहे. त्याला जास्त दोष दिला

 अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यामुळे आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येसाठी घराणेशाहीला जबाबदार म्हटले जात आहे. त्यातही करण जोहर जास्त टीकेचा धनी ठरत आहे. त्याला जास्त दोष दिला जात आहे.

करणने सुशांतच्या मृत्यूनंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली होती ज्यात त्याने लिहीले आहे की, गेले वर्षभर मी तुझ्याशी बोललो नाही, या गोष्टीचा मला खेद वाटतोय. या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी करणला धारेवर धरले. लोकांना करणचे वागणे आवडले नाही. करणच्या नेपोटीझमवरून अनेकांनी टीका केली. लोकांनी त्याचे सिनेमे न पाहण्याचा निश्चय केला आहे. तशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच इन्स्टाग्रामवरचे करणचे फॉलोअर्स कमी होत आहेत. लोकांनी करण जोहरला अनफॉलो करून आपला विचार पोहोचविला आहे. करणचे १ कोटी १० लाख फॉलोअर्स होते त्यातले १० लाख कमी झाले आहेत आणि अजुन कमी होत आहेत. लोक त्यासाठी इन्स्टाग्रामवर आवाहन करत आहेत. एक प्रेक्षक, एक चाहता म्हणून ज्याप्रकारे आपण नेपोटीझमला विरोध दर्शवू शकतो त्या त्या प्रकारे तो दर्शवूया, असे आवाहन लोकांकडून केले जात आहे.

दुसरीकडे नेपोटीझमवर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाला अनेकांनी फॉलो करणे सुरु केले आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या १२ लाखवरून ३२ लाखांवर गेली आहे. कंगनाने सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीला दोष दिला. तिचा त्यासंदर्भातला व्हिडिओ अनेकांनी पाहिला. लोकांना बॉलिवूडची एक नवी बाजू समजली.