karan johar

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या संबंधितांना एनसीबीने (NCB) समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे करण जोहर देखील एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असून त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या(sushant singh rajput case) तपासावेळी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. तेव्हापासून एनसीबीच्या रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. आता बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि त्याच्या संबंधितांना एनसीबीने (NCB) समन्स बजावल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे करण जोहर देखील एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असून त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

आज बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी तपास करताना बऱ्याच कलाकरांची नावे समोर आली आहेत. ६७ ए कलमाअंतर्गत एनसीबीने अनेकांना समन्स बजावले आहे. यामध्ये काही धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहरच्या संबंधित लोक आहेत. करण जोहरची चौकशी होण्याची शक्यता आहे.