रंगवलेल्या केसांचा करण जोहरचा नवा लूक

करण जोहर नेहमीच त्याच्या करिष्माई सहवासाने सर्वांना आनंद देत असतो. ‘कॉफी विथ करण’च्या या ‘होस्ट’ने यावेळी तर स्वतःचा एक वेगळाच ‘लूक’ असलेला व्हिडिओ

 करण जोहर नेहमीच त्याच्या करिष्माई सहवासाने सर्वांना आनंद देत असतो. ‘कॉफी विथ करण’च्या या ‘होस्ट’ने यावेळी तर स्वतःचा एक वेगळाच ‘लूक’ असलेला व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’च्या ‘प्रोफाईल’वर टाकला आणि आश्चर्य म्हणजे त्यात त्याच्या डोक्यावर एकही पांढरा केस दिसत नाही. म्हातारा म्हणवून घेण्याचा कमालीचा कंटाळा आलेल्या करणने, देशातील सर्वात आघाडीचा क्रीम हेअर कलर ब्रॅंड असलेल्या ‘गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम’च्या सहाय्याने घरच्याघरी स्वतःच केस रंगवले आहेत. ‘#कलरलाइककरण’ असा ‘हॅशटॅग’ही त्याने वापरला आहे. स्वतःच्याच केसांचे हे नवे रूप पाहून खुष झालेल्या ‘बॉम्बे वेल्वेट’मधील या अभिनेत्याने यापुढे केवळ मुख्य भूमिकाच करायच्या, असा निश्चय केला असावा, असे त्याच्या ‘हॅशटॅग पोस्ट’वरून वाटते.

सध्याच्या टाळेबंदीच्या वातावरणात अनेकजणांनी आपल्या केसांकडे दुर्लक्ष केलेले आहे. आपले केस पांढरे आहेत, हेही अनेकजण जणू विसरून गेले आहेत. करणचीही मानसिकता अशीच काहिशी होती. ‘स्टुडंट ऑफ द यीअर’च्या या दिग्दर्शकाने ५ मे रोजी आपला पांढऱ्या केसांसहीतचा फोटो पोस्ट केला आणि यापुढे आपल्याला केवळ वडिलांच्या भूमिका कराव्या लागणार असल्याचे म्हटले. या फोटोमुळे एकता कपूर, फराह खान, विशाल दादलानी, शिल्पा शेट्टी यांसारखे बॉलिवूडमधील अनेकजण गोंधळात पडले. काहीजण गंभीर झाले, तर काहींनी थट्टामस्करी सुरू केली. ठिकठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यश व रुही या करणच्या दोघा मुलांना तर, आपले वडील जास्तच लवकर म्हातारे होत असल्याचे वाटले. अर्थात या सर्व प्रतिक्रिया फॅशनप्रेमी असलेल्या करणला मान्य होण्याजोग्या नव्हत्या आणि त्याने यावर स्वतःच मार्ग काढायचे ठरवले. गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीम आणि करण जोहर यांच्या सहयोगातून, ‘घरीच केस रंगवणे किती सोपे असते आणि सध्या घरातच असलो, तरी आपण निस्तेज दिसायलाच पाहिजे असे नाही’, याचा एक वस्तुपाठ लोकांना देण्याचे ठरले. सलून सुरू असो किवा नसो, करणने स्वतः मनावर घेतल्याने त्याचे केस आता सुंदर दिसू लागले आहेत. व्हिडिओमध्ये करण जोहर त्याच्या काळ्या केसांसह दर्शकांच्या समोर येतो आणि सांगू लागतो, ‘’पांढऱ्या केसांमुळे मी कूल दिसत असलो, तरी फॅन्स, इंडस्ट्रीतले मित्र आणि कुटुंबीय यांना हा लूक मान्य नव्हता. पांढऱ्या केसांमुळे मी म्हातारा दिसतो, असे म्हणत त्या सर्वांनी मला केस रंगवून घेण्याचा सल्ला दिला.’’ असल्या सल्ल्यांमुळे निराश होऊन करणने गोदरेज एक्स्पर्ट रिच क्रीमने केस रंगवण्याचे ठरवले आणि ‘अनुष्कावाला हेअर कलर’ पसंत केला. याअगोदर कधीही स्वतःचे केस रंगवले नसल्याने, करणला धास्ती वाटत होती. त्याने सोप्या सूचनांचे पालन केले – ‘मिसळा, लावा आणि धुवून टाका.’ ज्या नेमकेपणाने त्याला हे जमले, त्याने तो आश्चर्यचकीत झाला. त्याने काढलेल्या सेल्फीवरून त्याला झालेला आनंद व ‘हे आता कसे व्हायरल होत जाणार’, ही त्याची प्रतिक्रिया स्पष्ट होते.
 
 आपल्या नव्या लूकविषयी बोलताना करण जोहर म्हणाला, ‘’पांढऱ्या केसांमुळे अनेक प्रतिक्रिया व्यक्त होतात. ‘खुपच भारी’ इथपासून ‘हॅलो अंकल’पर्यंतच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया मी अनुभवल्या. मी म्हातारा का दिसतोय, असे माझ्या मुलांनी विचारल्यावर मी घरीच केस रंगवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. मला फार काही करावे लागले नाही. घरी लावण्याजोगा, नैसर्गिक घटक असलेला रंग मला मिळाला आणि माझे काम झाले.’’ या नव्याने रंगवलेल्या केसांविषयी इतर सेलिब्रिटीज काय मत व्यक्त करतात, हे पाहण्याची उत्सुकता आता करणप्रमाणेच आम्हालादेखील आहे.