aliaa bhatt

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून करणनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, यात रणवीर-आलियासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत असल्याची माहितीही दिली आहे.

    एका पेक्षा एक हिट म्युझिकल हिट देणारा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला दिसणार आहे. धर्मा प्रोडक्शन्स, धर्मॅटीक एन्टरटेन्मेंट, डीसीए, धर्मा २.० आणि धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी अशा विविध निर्मिती संस्थांच्या माध्यमातून एका मागोमाग एक नवनवीन चित्रपटांची निर्मिती करत टॅलेंडेट नवदिग्दर्शकांना संधी दिल्यानंतर करण पुन्हा दिग्दर्शनाकडे वळला आहे.

    या चित्रपटाचं टायटल ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ असून, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटांनंतर थेट २०१६ मध्ये ‘ए दिल है मुश्कील’द्वारे करणनं कमबॅक केलं होतं. आता तब्बल पाच वर्षांनंतर करणनं पुन्हा एकदा दिग्दर्शनाची सूत्रं हाती घेतली आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून करणनं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून, यात रणवीर-आलियासोबत धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत असल्याची माहितीही दिली आहे.

    हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता द्वारा निर्मित, या चित्रपटाचा स्टुडिओ पार्टनर वायाकॅाम १८ आहे. या चित्रपटाचे संवाद इशिता मोइत्रा यांचे असून, कथा इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेली आहे. हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आहे.