… म्हणून करण जोहरने दिला मुंबई फिल्म फेस्टीवल बोर्डाचा राजीनामा ?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या चर्चांना उधाण आले. यात सगळ्यात जास्त टीका झाली ती करण जोहरवर. लोकांचे असे म्हणणे आहे की, करण जोहर नेहमी घराणेशाहीला प्रोत्साहन देतो.

 सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या चर्चांना उधाण आले. यात सगळ्यात जास्त टीका झाली ती करण जोहरवर. लोकांचे असे म्हणणे आहे की, करण जोहर नेहमी घराणेशाहीला प्रोत्साहन देतो. बॉलिवूडमधील दिग्गजांच्या मुलांना नेहमी आपल्या चित्रपटांमध्ये स्थान देतो. बाहेरून आलेल्यांना देत नाही. यावर करण जोहरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्याने मुंबई फिल्म फेस्टीवल बोर्डाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

करण जोहरला सध्या खूप ट्रोल केले जात आहे. त्यामुळे करण जोहर दु:खी आहे. घराणेशाहीच्या आरोपाला कंटाळून त्याने मुंबई फिल्म फेस्टीवल बोर्डाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुशांतचे चाहते करणवर सोशल मीडियावर खूप टीका करत आहेत. अनेकांनी याआधी करणचे चित्रपट न पाहण्याचा निर्णय घेतला. करणचे सोशल मीडियावरचे फॉलोअर्स झपाट्याने कमी होत आहेत. अशातच करणने मुंबई फिल्म फेस्टीवल बोर्डाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.