करण जोहरला करायचं आहे ‘या’ अभिनेत्याबरोबर Bigg Boss चं होस्टींग!

पहिल्‍यांदाच अनोखा रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' टे‍लिव्हिजनवर प्रिमिअर होण्‍यापूर्वी पहिल्‍या सहा आठवड्यांसाठी फक्‍त वूटवर दाखवण्‍यात येणार आहे.

    ‘बिग बॉस ओटीटी’ची घोषणा करण्‍यात आल्‍यापासून शोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि शोचे नवीन स्‍वरूप, स्‍पर्धक आणि विशेषत: होस्‍टसह भारतभरातील प्रेक्षकांना आकर्षून घेतले.

    प्रत्‍येकजण करण जोहर यांनी शोमध्‍ये आणलेल्‍या सॅसीनेसबाबत चर्चा करत आहेत. करण यांना त्‍यांचा को-होस्‍ट म्‍हणून कोणासोबत काम करायला आवडेल याबाबत विचारले असता त्‍यांनी प्रांजळपणे ‘रणवीर सिंग’चे नाव घेतले. करण म्‍हणाले, ”रणवीर हा बॉलिवुड इंडस्ट्रीतील ऊर्जा व मनोरंजनाचा पॉवरहाऊस आहे आणि त्‍याला पाहणे व त्‍याच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करणे ही एक पर्वणीच आहे. तो या भूमिकेसाठी अगदी योग्‍य आहे, कारण तो ओव्‍हर दि टॉप, अद्वितीय, मनोरंजनपूर्ण आणि नेहमीच स्‍वत:च्‍याच उत्‍साहामध्‍ये असतो, जे शोसाठी आवश्‍यक आहे.”

    पहिल्‍यांदाच अनोखा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ टे‍लिव्हिजनवर प्रिमिअर होण्‍यापूर्वी पहिल्‍या सहा आठवड्यांसाठी फक्‍त वूटवर दाखवण्‍यात येणार आहे. करण जोहर व रणवीर सिंग यांना एकत्र काम करताना आणि एपिसोडचे होस्‍ट होताना पाहण्‍याची तुमची इच्‍छा आहे का?