‘करणचे विवाहबाह्य संबध माझ्याकडे पुरावे आहेत’, अटकेनंतर पत्नी निशाने केले खळबळजनक खुलासे!

एका मुलाखतीत नीशाने खळबळजनक खुलासा केला आहे. करण मुलाची म्हणजेच कविशची जबाबदारी घेण्यास तयार नसून गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर अत्याचार सुरू असल्याच नीशा म्हणालीय.

  ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा याला त्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही तासातंच करणची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान करणने पत्नी निशावर काही आरोप केल्यानंतर आता पुन्हा एकदा नीशाने करणवर नवे आरोप लावले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

  नीशा रावलने करणवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता दोघांच्या भांडणासाठी करणचं अफेअर कारणीभूत असल्याचा खुलासा तिने केला आहे. करणचे विवाहबाह्य संबध आहेत त्यामुळे अनेक वर्षांपासून नात्यात तणाव आल्याचं ती म्हणाली आहे.

  एका मुलाखतीत नीशाने खळबळजनक खुलासा केला आहे. करण मुलाची म्हणजेच कविशची जबाबदारी घेण्यास तयार नसून गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर अत्याचार सुरू असल्याच नीशा म्हणालीय. करण मेहराच्या प्रतिष्ठेसाठी मी अनेक वर्ष या अत्याचारांबद्दल बोलले नाही. एखाद्या अभिनेत्यासाठी त्याची कारकीर्द आणि प्रतिमा अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि म्हणूनच मी गप्प बसले.” असा दावा नीशाने केलाय.

  करणवर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा ने केला आहे. पती करण मेहराच्या फोनवर काही मसेज आल्यानंतर त्याच्या अफेअर बद्दल लक्षात आल्याचं ती म्हणाली. मात्र कुटुंब आणि मित्र परिवारापासून तिने सर्व गोष्टी लपवल्या. लग्न टिकणार नाही हे लक्षात आल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं निशा म्हणाली.

  दरम्यान करणनेही नीशावर काही आरोप केले आहेत. निशाने करणच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली असून त्यांना धमकावल्यचा आरोप करणने केलाय. निशाने पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याचा दावा त्याने केलाय.