kareena - saif

मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. आज सकाळी ९ वाजता करिनाने बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. सध्या कपूर आणि खान परिवार अतिशय आनंदात आहेत.

    अभिनेत्री करिना कपूरने आज सकाळी ९ वाजता आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला.  अभिनेता सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे.  सैफिनावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता सोशल मीडियावर नवीन नवाबाच्या नावाची चर्चा रंगली आहे.

    करीना आणि सैफ आपल्या दुसऱ्या दाम्पत्याचे काय नाव ठेवणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भातील अनेक मिम्स सुद्धा ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. सैफ-करीनाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते. २०१६ मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता.