करिना कपूरच्या या मास्क किंमत माहितेय का? कधी स्वप्नातही विचार केला नसेल एवढं महाग आहे हे साधं दिसणार मास्क!

करीना कपूर खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये तिने तोंडाला मास्क लावून फोटो शेअर केला आहे.

    गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. गोविंदा, अक्षय कुमार, विकी कौशल, आलिया भट्ट, कतरिना कैफ, परेश रावल, भूमी पडणेकर अशा अनेक कलाकरांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानने मास्क वापरा असं आवाहन केलं आहे. पण तीच्या मास्कने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.

     

    करीना कपूर खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये तिने तोंडाला मास्क लावून फोटो शेअर केला आहे. ‘हा कोणता प्रोपोगंडा नाही. मी फक्त मास्क लावण्याचे आवाहन करत आहे’ असे म्हटले आहे. करीनाने वापरलेल्या या काळ्या मास्कची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

     

    हे मास्क दिसायला अगदी साधे असले तरी त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल. फोटोमध्ये करीनाने तोंडाला लावलेल्या मास्कवर LV असे लिहिले आहे. या मास्कची किंमत $355 डॉलर आहे. म्हणजे जवळपास २४ हजार ९९४ रुपये. करीनाच्या या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सध्या चर्चेत आहे.